लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सुरु असलेल्या मतमोजणीत काँग्रेस ११३, भाजप १०७, बसप ४ तर ईतर पक्ष ६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत नसून, सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कुठल्याच पक्षाला बहुमत
नसले तरी, काँग्रेस कोणाचाही पाठींबा न घेता सत्ता स्थापन करेल असा विश्वास काँग्रेस
नेत्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने निकाल लक्षात घेत, अपक्षांना जुळवून
घेण्याची जबाबदारी दिग्विजय सिंह यांना दिली आहे. त्यामुळे कोणालाही स्पष्ट बहुमत
न मिळाल्यास अपक्ष कोणाच्या बाजूने जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.